PM Kisan 18th installment: PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशीम इथं जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या योजनेचा 18वा हप्ता जारी करणार आहेत. या माध्यमातून 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹20,000 कोटी रुपये जमा केले जातील.
रक्कम कधी मिळते?
ह्या योजनेत केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना तयार केली आहे. ही मदत दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्याने दिली जाते, जी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे पोहचते. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती.PM Kisan 18th Installment
हप्ता मिळवण्यासाठी काही अटी
मात्र, ह्या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही अटी पूर्ण करायला लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना काही तपशील द्यावे लागतात आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जर तुम्ही ह्या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमचा नोंदणी क्रमांक लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि e-KYC अपडेट ठेवा.
e-KYC गरजेचं का आहे?
PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य आहे. ह्या प्रक्रियेत आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येतो किंवा CSC सेंटरमध्ये बायोमेट्रिकद्वारेही e-KYC पूर्ण करता येते. जर तुमचं e-KYC पूर्ण नसेल तर हप्ता अडकू शकतो. e-KYC स्टेटस तपासण्यासाठी PM किसान पोर्टलवर जाऊन तपासता येईल.
e-KYC स्टेटस कसं तपासायचं?
PM किसान योजनेतील लाभार्थी शेतकरी त्यांचं KYC स्टेटस तपासू शकतात. त्यासाठी त्यांना pmkisan.gov.in वर जावं लागेल. इथं ‘Farmers Corner’ दिसेल, त्यात पहिला पर्याय ‘e-KYC’ असेल. त्यावर क्लिक केल्यावर आधार क्रमांक टाकावा लागेल आणि OTP नंतर स्टेटस समजेल. जर e-KYC अधुरी असेल तर अपडेट करता येईल.
e-KYC कसं करायचं?
प्रथम pmkisan.gov.in या साइटवर जा. होमपेजवर ‘Farmers Corner’ विभागात ‘eKYC’ हा पर्याय निवडा. तिथं तुमचा 12 अंकी आधार क्रमांक द्या आणि ‘Search’ बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल. OTP टाका आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा. यशस्वी e-KYC नंतर तुम्हाला मेसेज मिळेल की तुमचं e-KYC यशस्वीरीत्या पूर्ण झालं आहे.
डिस्क्लेमर:येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी tipsmarathi.com किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.